Posts

Jumping to Conclusions

जंक हा शॉटफॉर्म मी  जंपिंग टू कन्क्लूजन  या लॉजिक एररसाठी करून ठेवलेला आहे.जंक फूड जसे तब्येतीला चांगले नाही तसेच जंक विचार मानसिक तब्येतीला चांगले नाहीत. जंपिंग टू कन्क्लूजन म्हणजे निष्कर्षाप्रत उडी मारणे.   आपण आपल्या जीवनात रोज अनेक व्यक्तींच्या वर्तनाचे, स्वतःच्या वर्तनाचे व परिस्थितीचे मूल्यमापन करीत असतो तेव्हा पुरेशी माहिती हाती उपलब्ध नसताना देखील आपण निष्कर्ष काढण्याची घाई केली अथवा निष्कर्षावर येण्याची उडी मारली तर त्यास जंपिंग टू कन्क्लूजन असे म्हणावे. वैज्ञानिक विचार पद्धतीने संशोधन करताना शास्त्रज्ञ उपलब्ध माहितीचा पुरेपूर वापर करतात. वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरून सत्य काय याचे निष्कर्ष शोधण्याचा प्रयत्न करतात. आपण जे शोधतो आहे त्याच्या विरोधी मत हेसुद्धा योग्य असू शकते असा वैज्ञानिक विचारपद्धती मध्ये मतप्रवाह असतो.  रोजच्या जीवनात मात्र आपण पुरेश्या माहितीच्या अभावी निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो आणि चुकीचे निर्णय घेतो, अथवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो.यास जम्पिंग टू कनकलूजन म्हणजे जंक असे म्हणायला हवे असे जंक मानसिक आरोग्याला हानिकारक असते....

कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन म्हणजे वैचारिक गफलती

कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन म्हणजे वैचारिक गफलती आपण विचार करताना अनेकदा काही वैचारिक चुका करत असतो. याला मानसोपचाराच्या भाषेत कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन असे म्हणतात.  उदाहरणार्थ ओवरजनरलायझेशन म्हणजे अतिसमावेशीकरण :-  मानवी मन कसे काम करते हे लक्षात घेतले तर अति समावेशकता आपल्याला लगेच समजेल. माणसाचे मन अनेक ठिकाणी पॅटर्न पाहण्याचा प्रयत्न करत असते. एखाद्या घटनेतून किंवा अनुभवातून आपण जीवनाबद्दल एकंदरीत निष्कर्ष काढायला जातो.  या वैचारीक गफलती समजून घेणे गरजेचे आहे. एका उदहरणातून समजून घेऊ. अनेक लोकांना असे वाटते की, ग्रामीण भाषा  वापरणारा माणूस कमी बुद्धीचा असतो. अथवा कमी शिकलेला प्रत्येक माणूस कमी बुद्धीचा असतो.  खरे तर आपण आपल्या आजूबाजूला अनेक ग्रामीण माणसं उच्च पदांवर काम करताना पाहिलेली असतात अथवा अनेक कमी शिकलेली माणसे उत्तम व्यवसाय करताना पाहिलेली असतात. आणि हे दोन्ही आपल्याला अनेकदा पुरावे देत असतात परंतु परिस्थितीचा काही एक पैलू आपण दुर्लक्षित करत राहतो. आपल्या नकळत स्वीकारलेल्या दृष्टिकोनामुळे परिस्थितीचा हा पैलू आपल्याला पाहता येत नाही.  आपले अनुभव हे व्यक...

Anxiety Disorder.

चिंतेचे आजार  भीती हा माणसाचा नैसर्गिक गुण आहे. जेव्हा आपण आदिमानव होतो तेव्हापासूनच आपण घाबरत असावं. मोठा आवाज झाला की घाबरणे हे अगदी लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आपोआपच होते. वाघासारखा प्राणी पाहून देखील आपोआप भीती वाटते. या भीतीने आपल्याला जिवंत ठेवण्यात खूप मोठा मोठे योगदान दिले आहे. समोरून मोठा ट्रक येत असताना धाडस करून रस्ता ओलांडायचे ठरवले तर त्या माणसाला आपण बावळट म्हणू. तेव्हा वास्तववादी भीती असायला हवी. पण आपल्या मेंदूला कधी घाबरायचे आणि कधी घाबरायचं नाही हे शिकवण एक कठीण टास्क आहे. प्रमाणाबाहेरची भीती चिंता घेऊन येते. सतत काळजी वाटणे, अस्वस्थ वाटणे, खूप जास्त विचार मनात येत राहणे, इत्यादी लक्षणे जनतेच्या चिंतेबाबत दिसून येतात. चिंतेचे आजार साधारणतः 30 टक्के लोकांना कधी ना कधी होऊन जातात. पण चिंतेचे एका वर्षातील एखाद्या समाजातील प्रमाण दहा टक्के इतके असते. हे प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. याचा अर्थ चिंतेचे आजार समाजात सर्व दूर आढळतात. आपल्याला ते ओळखता येत नाहीत हा आपला दोष. मी काल अभ्यास करत असताना मला असे लक्षात आले की, लहानपणी समुपदेशन उपलब्ध असते आणि त्याबद्दल मला ...

A D H D नवा अनुभव

2022 या वर्षात मी इगतपुरी मध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करत होतो. तिथे इयत्ता सहावी मध्ये रितेश हा विद्यार्थी शिकत होता. हा विद्यार्थी वर्गात मोठ्या प्रमाणात दंगामस्ती करायचा. त्याची सखी बहीण दोन वर्ष पुढे शिकत होती. दोघेही विद्यार्थी बुद्धिमान होते हे मला त्यांच्याकडे पाहून कळत होते. परंतु रितेश हा मात्र बुद्धीने चांगला असला तरी वर्गात लक्ष देऊ शकत नसे. एका जागेवर बसून स्थिर चित्ताने अभ्यास करणे हा गुण त्याच्यात बिलकुल आढळत नव्हता. शिक्षकांना साहजिकच हा विद्यार्थी फार प्रिय नव्हता. शिक्षक त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करायचे. मी या विद्यार्थ्याच्या पालकांना मनोविकार तज्ञ व्यक्तीला भेटण्याचे सुचवले. परंतु आपल्या मुलाला काही विकार असेल असे पालकांना वाटत नव्हते. पालकांनी डॉक्टरकडे न जाण्याचा निर्णय घेतला. यावर्षी मात्र अजूनही पाल्यात सुधारणा होत नाही हे लक्षात येऊन पालकांनी डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. मोठी मुलगी हुशार आणि चुनचुनित होती. तिने इंटरनेटवरून याविषयीची माहिती गोळा करून पालकांना हा विषय समजावून सांगितला. आपल्या मुलाला अस...

मदतीचे सोपे नुस्खे

थेरपी मधल्या काही गोष्टी अगदी सोप्या सोप्या वाटतात. सोप्या वाटलं तरी त्या संकल्पनांमध्ये सॉलिड दम असतो.  कार्ल रॉजर्स नावाचा एक नामांकित मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याची क्लायंट सेंटर्ड थेरपी ही पद्धत त्यानी विकसित केली. त्याच्या या पद्धतीला बऱ्याच मर्यादा देखील आहेत. साहजिकच आपण अभ्यासात असलेल्या सर्व संकल्पना मर्यादा असतात अशा याही संकल्पनेला आहेत.  हा रॉजर्स असं म्हणतो की, माणसाला जर पुरेसे पोषक वातावरण दिले तर माणूस स्वतःला विकसित करत नेतो. रॉजर्सचे म्हणणे असे की माणसे विश्वास ठेवण्यासारखी असतात आणि त्यांना स्वतःला समजून घेण्याचे काम जमू शकते. स्वतःला सकारात्मक दिशा देण्याची ताकद माणसांमध्ये असते. Empathy म्हणजे समानुभव  Unconditional Positive Regard म्हणजे बिनशर्त सकारात्मक विचार/ आदर Genuineness  म्हणजे विशुद्ध खरेपणा या गोष्टी समोरच्या व्यक्तीला स्वतःचा शोध घेत उपचारात्मक व्यक्तिमत्व बदल घडवून आणण्यास पुरेशा आणि गरजेच्या आहेत.  अनेकदा आपल्या अवतीभवती अनेक व्यक्ती अशा असतात ज्यांना मदतीची गरज असते. त्यांनी अनेकविध चुका केल्याने ते परिस्थितीच्या वेढ्यात अडक...

Vikas Story

Once upon a time, in a fast paced town, lived a person named Vikas. Vikas had been struggling with depression for quite some time. Every day felt like a heavy burden, and the world seemed devoid of color and joy. One day, while searching for a way to heal, Vikas stumbled upon a psychotherapist Yogesh . With a warm smile and a compassionate demeanor, Mr. Yogesh  welcomed Vikas into their cozy office. Through weekly sessions, they began to uncover the layers of pain and negative thoughts that had taken root within Vikas's mind. He employed various therapeutic techniques, helping Vikas reframe his negative thought patterns and guiding him towards healthier coping mechanisms. They encouraged Vikas to express their feelings openly, creating a safe space for vulnerability and self-discovery. Over time, Vikas started to notice subtle shifts in his perspective. The darkness that once enveloped their life began to recede, replaced by glimmers of hope and moments of contentment. As the weeks...

मेंटल फिल्टर

मेंटल फिल्टरिंग हा वैचारिक गफलतीचा एक प्रकार आहे. मी स्वतः या विचार चुकीचा शिकार झालोय.  मेंटल फिल्टर हा फार गमतीशीर प्रकार आहे.  आपण लहानपणी अशी म्हण ऐकायचो की, ज्याला कावीळ झाली आहे त्याला जग पिवळं दिसणार. ही गोष्ट शत प्रतिशत खरी आहे. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तश्या प्रकारे आपण मनात प्रतिमा तयार करून घेतो. आणि खरं वास्तव तपासण्याची तसदी घेत नाही. वास्तवापासून दूर अनेक विचार आपल्या मनात नाचतात. जसं की, समोरच्या व्यक्तीने मला तू आज छान दिसतेस असं म्हंटले की, आपण असा विचार करतो की, मला चांगलं वाटावं म्हणून म्हणत असणार किंवा माझ्या कडून काही हवे असेल. पण अनेकदा आपण छान दिसतोय यावर आपण विश्वास ठेवत नाही. आपल्याला असा सकारात्मक प्रतिसाद मिळाला की तो स्वीकारण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घ्यायला हवा.  आपण नेमके उलट करतो. सकारात्मक गोष्टी स्वीकारत नाही आणि नकारात्मक मात्र स्वीकारतो. कोणी आपल्यासोबत वाद केले तर आपण ते अगदी उत्तम लक्षात ठेवतो. आणि त्यावर धुस्फुसत राहतो आणि तोच मूड कॅरी करत राहतो.  नेमके याच्या उलट फिल्टर्स आपण वापरायला हवे.  मूड खराब करणाऱ्या घटना घडल्या...

बातमी

  बातम्यांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना दाखवल्यानंतर आपल्याला त्यामुळे फारच कसंतरी वाटू लागते.  अशा वेळेला आपण नेमकं काय करावं असा एक प्रश्न मला माझ्या नातेवाईकाने विचारला ?   त्याला उत्तर देताना मला असे जाणवले की ही समस्या अनेकांना असेल तर आपण याचा लेख बनवून ब्लॉगवर पोस्ट करावा. माणूस प्राण्याला गेंडा सारखे जाड कातडे नाही की वाघासारखे तीक्षण नखे नाहीत. हरणासारखे चपळ पाय नाहीत.  पळून जायचे म्हटले तर वेग नाही. माकडासारखे पटपट झाडांवरून उड्या मारण्याची कौशल्य नाही.  मग निसर्गाने मानवाला काय दिले तर एक मेंदू  जो अगदी पटापट काम करू शकेल.  भीती ही भावना माणसाला जिवंत ठेवण्याचे काम करते.  म्हणजे असे पहा की माणूस घाबरलाच नाही तर तो कुठल्यातरी हिंसरा श्वापदाकडून शिकार होईल आणि संपूर्ण जाईल त्यामुळे माणसाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी खूप घाबरणारा मेंदू तयार करणे आवश्यक होते.  हा मेंदू माणसाला सातत्याने आजूबाजूला काही धोका तर नाही ना याची माहिती घेण्यास प्रवृत्त करतो.  त्यामुळे कोणतीही धोकादायक परिस्थिती पाहिल्याबरोबर माणसाला त्या घटन...

मानसोपचाराची शक्ती : आनंद आणि आशा

  शीर्षक: मानसोपचाराची शक्ती : आनंद आणि आशा जीवनातील आव्हानांच्या मध्यभागी, नैराश्य आपल्या आत्म्यावर गडद काळी सावली टाकत असते, ज्यामुळे आपल्याला हरवलेले, थकलेले आणि आशा नसल्यासारखे वाटते. पण अंधाराच्या या क्षणांमध्येच मानसोपचाराची  क्षमता अधिक चमकते. स्वत:चा शोध आणि उपचारांच्या प्रवासाला सुरुवात करून, क्लायंट त्यांच्या उद्देशाची जाणीव परत मिळवू शकतात, थेरपिस्टच्या पाठिंब्याने जीवनातली दृष्टी परत मिळवत असतात आणि शेवटी जीवनाचे सौंदर्य पुन्हा शोधत असतात. या लेखात, प्रेरणादायी उदाहरणे मांडली आहेत.  जी नैराश्‍याच्‍या खोलीतून व्‍यक्‍तींना उत्‍थान करण्‍यामध्‍ये मानसोपचाराची बहुमोल भूमिका स्पष्ट करतात. यातली पहिली कथा प्रियाची आहे.  जी स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहे. प्रियाचा निराशेतून सशक्तीकरणापर्यंतचा प्रवास: प्रियाचे आयुष्य निराशेच्या अथांग गर्तेत गेले होते. प्रत्येक दिवस जबरदस्त दुःखदायक वाटत होता.स्वतःबद्दल मनात आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. जीवन कधीही न संपणारी लढाई वाटत होती. तथापि, एका कुशल मनोचिकित्सकाच्या मार्गदर्शनाद्वारे प्रियाने तिच्या भावना, भीती आणि भूतकाळातील...

धर्म आणि संस्कृती

विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते असे एक वाक्य अनेकदा आपल्या माथ्यावर मारले जाते. असे काहीसे सध्या सरसंघ चालक  बोलले आहेत. वस्तुस्थितीत विज्ञान आपल्याला काय कळत नाही हे नम्रपणे मान्य करते. धर्माचे ठेकेदार मात्र आपल्याला जे कळत नाही ते आपल्याला कळत नाही असे मान्य करत नाही. परंतु विज्ञानवादी मात्र नकळतपणे काही चुका करतात. विज्ञानवादी धर्माच्या ठेकेदारांना धर्मापासून वेगळे करीत नाहीत हे सध्याचे दुर्दैव आहे. धर्म म्हणजे नैतिकतेने वागणे, इतरांशी प्रेमाने वागणे असा अर्थ सामान्य माणसाला धर्मातून अपेक्षित असतो. अध्यात्म म्हणजे आत्म अध्ययन करणे म्हणजे स्वतःला अभ्यासणे असा अर्थ केल्यास धर्म आपल्याला टाकाऊ वाटणार नाही आणि अध्यात्म हे देखील टाकाऊ वाटणार नाही. विज्ञानाने माणसाचे प्रश्न सोडवले तसे धर्माने सोडवले नाहीत हे आताशा शाळकरी पोरांना सुद्धा समजते. समजत नसेल तर ते आपले दुर्दैव. कोरोना काळात सरकारने रुग्णालय वाढवत मंदिरे मात्र बंद ठेवले ठेवली यातून जनतेला विज्ञानाची ताकद  समजणे इतकी जनता शहाणी आहे.  आपण शाब्दिक तलवारी काढून अध्यात्मावर सपासप चालवल्यामुळे देव, धर्म, अध्यात्म म...

सहानुभूती

  सहानुभूती म्हणजे इतरांच्या भावना समजून घेण्याची आणि सामायिक करण्याची क्षमता. हा एक अत्यावश्यक मानवी गुणधर्म आहे जो आपल्याला इतरांशी स खोल भावनिक पातळीवर जोडण्यास उपयुक्त ठरतो. सहानुभूती हीच आपल्याला इतर व्यक्तीच्या चष्म्यातून अथवा इतरांच्या डोळ्यांद्वारे जग पाहण्याची परवानगी देते. मजबूत नातेसंबंध निर्माण करणे, सामाजिक सौहार्द वाढवणे आणि समजूतदारपणा वाढवणे यासाठी सहानुभूती बाळगता येणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. सहानुभूती केवळ वैयक्तिक नातेसंबंधातच नाही तर कामाच्या ठिकाणीही महत्त्वाची आहे. सहानुभूती दाखवणारे बॉस आणि लीडर्स हे अधिक प्रभावी असण्याची अधिक शक्यता असते. जेव्हा कर्मचार्‍यांना त्यांचे ऐकले गेलेय आणि समजले गेले आहे असे वाटते, तेव्हा ते उत्पादक आणि निष्ठावान वागण्याची अधिक शक्यता असते. सहानुभूतीमुळे व्यवस्थापकांना अधिक समावेशक कामाचे वातावरण तयार करण्याची संधी मिळते जिथे प्रत्येकाला स्व प्रतिष्ठा जपल्याचे जाणवते आणि कामाबद्दल आदर वाटतो. पण सहानुभूतीचा सराव करणे थोडं अवघड आहे. दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन खरोखर समजून घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या विचारांना आणि दृष्टीकोनांना ब...

Depression

Depression Depression is a mental illness that affects millions of people worldwide. It is a complex condition that can manifest in different ways and can affect people of all ages, genders, and backgrounds. While some people may experience depression for a short period of time, others may suffer from it for years. It is important to understand the symptoms of depression and seek help if you or someone you know is experiencing it. Symptoms of depression Depression is a condition that affects a person's mood, thoughts, and behaviors. Some common symptoms of depression include: Feeling sad or hopeless for an extended period of time Losing interest in activities that were once enjoyable Changes in appetite or weight Sleeping too much or too little Fatigue or lack of energy Feeling guilty or worthless Difficulty concentrating or making decisions Thoughts of death or suicide If you or someone you know is experiencing any of these symptoms, it is important to seek help from a mental heal...

लावून व्यायामाची सवय....

लावून व्यायामाची सवय, जगूया निरामय आपण एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या जगात राहतो. आपण पोटभर जेवतो आणि किंबहुना अधिकच खातो. आणि व्यायामाच्या नावाने बोंबाबोंब. त्यामुळे आपली वजन नियंत्रणात नसतात. आपल्या वजनाबद्दल अनेकदा तितक्या जागरूकतेने आपण चर्चा करीत नाही. भारतीय माणसांचे पोट हमखास सुटलेले दिसते. आपण अन्न खाल्ल्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा वापरली गेली नाही तर तिथे चरबीत रूपांतर होते ती चरबी शरीरातील अवयवांसाठी राहते त्यामुळे मधुमेह रक्तदाब इत्यादी विकार होतात ते किडनी लिव्हर हृदय डोळे यावर परिणाम करतात. आपण जर नियमित व्यायाम केला तर स्वादुपिंडातील पेशी कार्यक्षम होतात आणि मधुमेह होण्यापासून आपल्या शरीराला सुरक्षित करतात. मेंदूमध्ये व्यायामाने आनंद लहरी प्रसवतात. नैराश्यासारख्या आजारापासून व्यायामामुळे संरक्षण मिळते. दैनंदिन ताणतणावापासून दूर राहण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. प्रत्येक वयामध्ये व्यायाम आपल्याला फायदे देत राहतो. आपल्याला देवाने असे विचारले की मी तुम्हाला फुकटात आयुष्याची काही वर्षे खूप सारे आरोग्य  देऊ इच्छितो , देऊ का  तर आपण त्याला म्हणू की जरूर...

स्व नियंत्रण

सेल्फ रेगुलेशन म्हणजे स्व नियंत्रण सध्या मी एका खाजगी शाळेमध्ये शालेय मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. शालेय मुलांना समाजामध्ये कसे वावरावे याचा परिपाठ घालून दिल्यास ती मुले मोठी होऊन भावनिकरित्या परिपक्व व्यक्ती म्हणून जीवन जगतात असा एक विचरप्रवाह आहे.  Socio Emotional learning असा तो विषय.  या विषयातला एक महत्त्वाचा मुद्दा मला प्रकर्षाने आवश्यक वाटतो तो म्हणजे स्व नियंत्रण.आपल्या बोलण्यावर किंवा वागण्यावर नियंत्रण म्हणजे स्व नियंत्रण.  माणसाचे स्वतःच्या विचार, भावना आणि वर्तन यांवर नियंत्रण असायला हवे. यापैकी इतरांनी आपल्याशी अयोग्य वागल्यानंतर आपल्या मनात काय प्रकारच्या भावना याव्यात आपल्या  नियंत्रणात नसते. पण त्यावर काय विचार करावा   आपले वर्तन कसे असावे हे आपण ठरवू शकतो.  आपले वर्तन आपल्या नियंत्रणात असते. आपले वर्तन म्हणजे आपण इतरांसमोर, समाजामध्ये वावरताना कसे वागतो, कसे वावरतो तसे बोलतो याची एकत्रित गोळाबेरीज.  काही लोकांना फार बोलण्याची सवय असते. जैविक रित्या  काही व्यक्तींना अधिक बोलण्याची गरज पडते. त्या गरजेचा फायदा होऊन ते लोक...

इमोशनल रिजनिंग

इमोशनल रिजनिंग ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की त्यात व्यक्तीला असे वाटते की, मला माझ्या भावनांत जे काही जाणवते ते म्हणजे खरे..अश्या चुकीच्या भावनांतला आशय सत्य मानण्याच्या प्रक्रियेमुळे माणसांमध्ये चिंता, अतिरिक्त भीती, स्ट्रेस (तणाव) या भावना निर्माण होतात. आधीच असणारी चिंतेची स्थिती चुकीच्या वैचरिक्तेने अधिक गडद होते. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला तिचा नवरा कितीही म्हणू देत की, मी तुझ्याशी एकनिष्ठ आहे परंतु त्या स्त्रीस मात्र असे वाटत राहते कि ज्या अर्थी तिला मत्सर भावना आहेत त्या अर्थी त्या असल्यामुळे तिचा नवरा तिच्याशी एकनिष्ठ नसणार. या विचारांतल्या गड्बडीस इमोशनल रिजनिंग असे म्हणतात. असे चुकीचे रिजनिंग ओळखून त्यात योग्य ते बदल केल्यास नैराश्य, चिंता या सारख्या आजारात मोठ्या प्रमाणात चांगला फरक पडतो. पण तितके अनेकदा पुरेसे ठरत नाही हे देखील नोंदवणे आवश्यक आहे. मी इंजिनिअरिंग करत असताना मला काही विषय अत्यंत अवघड वाटायचे आणि त्यामुळे मी हे विषय बोरीग आहेत असे लेबल लावून मोकळा व्हायचो यास लेबलिंग असे म्हंटले जाते. पूर्वग्रह ठेवून एखाद्या समस्येकडे पाहत राहिल्यास नेमके आकलन होत नाह...

Attention Deficit Disorder

यशची आई पालक सभेला गेली होती तेव्हा त्याच्या वर्गशिक्षिका असं म्हणाल्या की, "अहो तुमचा यश ना हुशार आहे, पण त्याचं वर्गात बर्‍याचदा लक्षच नसतं... मी काय शिकवते आहे,अभ्यासात कुठला भाग चालू आहे हे सांगणं त्याला अनेकदा जमत नाही...वाक्य तर सोडा..पराग्राफ कुठला सुरू आहे हे सुद्धा त्याला अनेकदा समजत नाही.. काही वेळा तो उत्तरे बरोबर देतो, अगदी बरोबर उत्तरे देतो पण अनेकदा चुकीची भलतीच काहीतरी उत्तरे देतो, त्याच्या अभ्यासात सातत्य नाहीये..त्याचं अभ्यासात लक्ष नाहीये.." यावर यशची आई म्हणाली, "मॅडम आम्हाला पण असं नेहमी वाटतं की, यश हुशार आहे पण म्हणावी इतकी मेहनत तो घेत नाही.. त्याला कष्ट करण्याचा बर्‍यापैकी आळस आहे...सोबतच त्याची चिडचिड अलीकडे वाढली आहे. साधारणतः मागच्या वर्षी आणि यावर्षी तर त्याचा अभ्यासातला आधीचा रस सुद्धा कमी होतोय असं आम्हाला जाणवतंय..." त्याला दुजोरा देत मॅडमनी एक वाक्य म्हंटलं... "यश अभ्यासात लहान सहान चुका करतो. म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर फार सोपं असतं, परंतु याच्याकडून अगदी सिली मिस्टेक होतात..अवघड प्रश्नाची उत्तरे अनेकदा सफाईदार पणे देतो. त्य...

लग्न आणि फसवणूक

बऱ्यापैकी जवळच्या नात्यातली एक बहीण माझ्याशी गप्पा मारताना म्हणाली की,माझं वय आता ३९ आहे आणि एक मुलगा जो तेरा वर्षाचा आहे. नवर्यासोबत चौदा वर्षं संसार केला. कोरोना काळात तिच्या नोकरीला पूर्ण विराम लागला म्हणून तिने पहिल्यांदाच नवर्याकडे पैसे मागितले. तिला असं वाटत होतं  की, ती घर चालवते याचा अर्थ तो सेविंग्स करत असणार. पण त्याने खरंतर काहीच जमापुंजी जमवली नव्हती, हे तिच्यासाठी धक्कादायक होतं . त्याने पैसे कसेही खर्च केले होते की कमावलेच नव्हते ? तिला लग्न नन्तर असे लक्षात आले की, नवरा खरेतर ग्रॅज्युएट नाहीये. त्याने खोटं सांगितलं. तो बारावी नापास झाला आणि त्याने शिक्षण सोडलं. मग तो कुरियर कंपनीमध्ये काम करू लागला. किती काळ केलं माहित नाही. आता ताईने त्याच्यापासून दूर होत मुलाची आणि स्वतःची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. ती आधीपासून अर्धवेळ क्लास चालवत होती. आता शिक्षण क्षेत्र रुळावर येतंय तशी आर्थिक घडी बसतेय.  या संपूर्ण केस मधून महत्वाचा मुद्दा अधोरेखित होतो तो म्हणजे फसवणुकीचा... माणूस माणसाला फसवतो हे अनादी काळापासून होत असावं. आपण फसवणारे होऊ नये हे खरंच. पण आपण सोबतच...

About me.

 पर्वा एका क्लाएंटचा कॉल आला होता. तो मला माझ्या मानसशास्त्र विषयातील एकंदरीत प्रवासाबद्दल विचारत होता. प्रत्येक वेळी प्रत्येकाला हे सांगणं शक्य होत नाही म्हणून शब्दरूपात मांडतोय.  २०१३ साली अभियांत्रिकीला असताना मी लोकसत्ता मध्ये एक लेख वाचला होता तो अल्बर्ट एलिस यांच्या बद्दलचा मी वाचलेला पहिला लेख. अल्बर्ट एलिस नावाची  हि व्यक्ती आपल्याला आयुष्यात पुढे प्रचंड प्रभावित करणार आहे. याची काहीच कल्पना तेव्हा नव्हती. एलिस बद्दल त्या लेखाने पोट भरलं नाही म्हणून मग वेगवेगळ्या साईट्सवर एलिस बद्दल काही मिळतंय का हे शोधत असताना मी अल्बर्ट एलिस हे पुस्तक हाती पडलं. अंजली जोशी यांनी मराठीतलं एलिस यांच्यावर लिहिलेलं चरित्र मी भराभर वाचत गेलो. त्यातून मानसशस्त्र हा आधी मनात सुप्त आवड असलेला विषय आता मला शिकवा असं वाटू लागलं. पण अभियांत्रिकीतून पास झाल्यांनतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी, भावाच्या हॉटेलमध्ये व्यवस्थापनात लक्ष देणे, घरातील गाड्यांच्या व्यवसायात लक्ष घालणे असे बहुविध उद्योग केले. मग २०१७ साली मी स्वतःला तणाव जाणवतोय या कारणाने मानसशास्त्रज्ञ गाठले ज्यांचा खूप प्रभाव माझ्य...

गर्द पुस्तक

गर्द  अनिल अवचट यांचं मुक्तांगण मित्र आपल्या पैकी अनेकांना ऐकून माहित असतंच . पण त्याच्या जन्माआधी गर्दवरचा त्यांचा अभ्यास अनेकांना माहित नसेल. मुंबई पुण्यात त्याकाळी ब्राऊन शुगरचं व्यसन जोरात होतं. अनेक तरुणांना या व्यसनाच्या विळख्याने अडकवलं होतं. अगदी गरीब मुलांपासून मध्यमवर्गीय लोकांपर्यंत, आणि अगदी मंत्र्याच्या पोरांपर्यंत गर्दचं व्यसन करणारे लोक सापडत. हे व्यसन इतकं भयानक आहे कि दोनदा ते घेतलं की, माणसाला ते व्यसन लागलंच म्हणायचं . हे व्यसन सोडणं औषधोपचाशिवाय जवळ जवळ अशक्य असायचं. असल्या माणसांना के इ एम रुग्न्यालयात एक अवलिया डॉक्टर फार आस्थेने पाहायचा. अगदी त्यांच्या त्यांच्या विभागात जाऊन त्यांची चौकशी करायचा. त्या पोरांच्या संघटना उभ्या राहायच्या. आणि त्या तरुण डॉक्टरच्या सोबतीने गर्दसोबत लढायच्या. ओपीडी सोडून असे लोकांत जाऊन काम करणारे डॉक्टर फारच क्वचित सापडतात. विशेष म्हणजे ज्याचे पैसे मिळत नाहीत असे काम करायचे कशाला असला प्रश्न त्याला पडायचा नाही. हा तरुण डॉक्टर होता डॉक्टर आनंद नाडकर्णी ( #डॉआनंदनाडकर्णी)  आणि त्याच्याकडे गर्दच्या व्यसनाचा अभ्यास करायला जाणारा प...

ध्यानाचा उपयोग आणि मर्यादा

ध्यानाचा उपयोग आणि मर्यादा :- विचार, भावना आणि वर्तन एकमेकांना फार संलग्न असतात. यातील विचार आणि भावना यांच्यावर आपले पूर्ण नियंत्रण नसते. वर्तनात मात्र बऱ्यापैकी बदल घडवता येतात. प्रत्येक वेळी घडवता येतातच असे नाही पण भावनेपेक्षा अधिक नियंत्रण वर्तनावर असते. वर्तन घडवण्यासाठी मूळ विचार आपल्याला करता येतो. मनातल्या मनात विचार वेगळ्या दिशेला नेणं हे मला अजून नीटसं जमलेलं नाही. पण वर्तनात बदल केल्यानंतर मात्र भावनांमध्ये बदल होतो हे मी अनेकदा अनुभवले आहे. वर्तनात बदल झाल्यावर मग विचारांची गाडी सुद्धा वेगळा टर्न घेते. जसे की प्रचंड ताण आल्यानंतर जर ध्यान केले तर मानसिक तणाव निवळतो. मला ध्यानाबद्दल नेहमीच अविश्वास वाटत असे. परंतु मनातील काही ताकदीचे पैलू आता अलीकडे लक्षात येत आहेत. आणि त्याचे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्तर सुद्धा सापडत आहे. अनेक बाबा लोक ध्यानाचे वर्ग हजारो रुपयांना भरवतात. तणावाची स्थिती होण्यासाठी तयार होणारे हॉर्मोन्स जसे की कॉर्टिसॉल यांचे प्रमाण ध्यानाने कमी होते. व त्यामुळे मनातील त्रासदायक भावना कमी होतात .परंतु बाबा लोक जसे की श्री श्री, सद्गुरु, सत्यसाई वगैरे लोक त...