लावून व्यायामाची सवय....

लावून व्यायामाची सवय, जगूया निरामय


आपण एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या जगात राहतो. आपण पोटभर जेवतो आणि किंबहुना अधिकच खातो. आणि व्यायामाच्या नावाने बोंबाबोंब. त्यामुळे आपली वजन नियंत्रणात नसतात. आपल्या वजनाबद्दल अनेकदा तितक्या जागरूकतेने आपण चर्चा करीत नाही. भारतीय माणसांचे पोट हमखास सुटलेले दिसते. आपण अन्न खाल्ल्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा वापरली गेली नाही तर तिथे चरबीत रूपांतर होते ती चरबी शरीरातील अवयवांसाठी राहते त्यामुळे मधुमेह रक्तदाब इत्यादी विकार होतात ते किडनी लिव्हर हृदय डोळे यावर परिणाम करतात.
आपण जर नियमित व्यायाम केला तर स्वादुपिंडातील पेशी कार्यक्षम होतात आणि मधुमेह होण्यापासून आपल्या शरीराला सुरक्षित करतात. मेंदूमध्ये व्यायामाने आनंद लहरी प्रसवतात. नैराश्यासारख्या आजारापासून व्यायामामुळे संरक्षण मिळते. दैनंदिन ताणतणावापासून दूर राहण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. प्रत्येक वयामध्ये व्यायाम आपल्याला फायदे देत राहतो. आपल्याला देवाने असे विचारले की मी तुम्हाला फुकटात आयुष्याची काही वर्षे खूप सारे आरोग्य  देऊ इच्छितो , देऊ का  तर आपण त्याला म्हणू की जरूर दे... निसर्ग आपल्याला व्यायामाच्या स्वरूपात आयुष्याची काही वर्ष, आयुष्याचा उंचावलेला दर्जा, रोजचा दिनक्रम जगताना अधिकची ऊर्जा इत्यादी देवू इच्छितो फक्त आपल्यावर अवलंबून आहे आपण ते घ्यायचे की नाही...

Comments

Popular posts from this blog

मदतीचे सोपे नुस्खे

About me.

कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन म्हणजे वैचारिक गफलती