बातमी

 बातम्यांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना दाखवल्यानंतर आपल्याला त्यामुळे फारच कसंतरी वाटू लागते.  अशा वेळेला आपण नेमकं काय करावं असा एक प्रश्न मला माझ्या नातेवाईकाने विचारला ? 

 त्याला उत्तर देताना मला असे जाणवले की ही समस्या अनेकांना असेल तर आपण याचा लेख बनवून ब्लॉगवर पोस्ट करावा.

माणूस प्राण्याला गेंडा सारखे जाड कातडे नाही की वाघासारखे तीक्षण नखे नाहीत. हरणासारखे चपळ पाय नाहीत.  पळून जायचे म्हटले तर वेग नाही. माकडासारखे पटपट झाडांवरून उड्या मारण्याची कौशल्य नाही.  मग निसर्गाने मानवाला काय दिले तर एक मेंदू  जो अगदी पटापट काम करू शकेल.  भीती ही भावना माणसाला जिवंत ठेवण्याचे काम करते.  म्हणजे असे पहा की माणूस घाबरलाच नाही तर तो कुठल्यातरी हिंसरा श्वापदाकडून शिकार होईल आणि संपूर्ण जाईल त्यामुळे माणसाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी खूप घाबरणारा मेंदू तयार करणे आवश्यक होते.  हा मेंदू माणसाला सातत्याने आजूबाजूला काही धोका तर नाही ना याची माहिती घेण्यास प्रवृत्त करतो.  त्यामुळे कोणतीही धोकादायक परिस्थिती पाहिल्याबरोबर माणसाला त्या घटनेची नोंद घेणे  कार्य प्राप्त असते.  परंतु सातत्याने अशी धोकादायक परिस्थिती राहिली तर माणसाने ती जागा बदलणे आवश्यक असते.  पण हे झाले पूर्वीच्या काळाच्या जंगलात राहणाऱ्या माणसाचे…


आताच्या काळात जेव्हा बातमी केली जाते.  तेव्हा अधिकाधिक लोकांनी आपल्या वेबसाईटवर यावे किंवा चॅनलवर यावे किंवा आपला खप व्हावा असा वृत्तमाध्यमांचा प्रयत्न असतो. त्याशिवाय त्यांना अधिकाधिक नफा कमवता येत नाही. तेव्हा आपण सातत्याने बातम्या पाहू नयेत आणि नकारार्थी बातम्या पाहणे टाळावे. परंतु आपल्या मनात दुसरा विचार असा येईल की मी नकारात्मक बातमी पाहण्याचे टाळलं तर जगात जगातली नकारात्मकता कमी होणार थोडीच… असा विचार येणे साहजिक आहे. आपण एक लक्षात घ्यायला हवे, की आजच्या जगात लोक पूर्वीपेक्षा अधिक चांगले जगत आहेत.  भारतासारख्या देशामध्ये दारिद्र्याचे प्रमाण भरपूर कमी झालेले आहे.

मध्यमवर्गीय लोकांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.  जीवनातल्या अत्यावश्यक गरजा भागवणे हे अधिक लोकांना शक्य होते आहे.  आणि जंतूजन्य आजारांवर मानवाने जवळजवळ विजय मिळवलेला आहे. लोकांचे आयुर्मान वाढते आहे. माणसाला सामाजिक समस्या उरल्याच नाहीत अशा गैरसमजात मला तुम्हाला टाकायचं नाहीये.  पण पूर्वीपेक्षा माणसे अधिक चांगले आयुष्य जगतायेत हे सत्य मात्र सांगायचे आहे.  तेव्हा आताच्या काळात फार वाईट झालंय वाईट घडतय असा गैरसमज आपण टाळायला हवा.

तुम्ही एखादी संसनाटी बातमी असल्याशिवाय वृत्तमाध्यमाच्या साईटला भेट देणार नाही. मग त्यांना जाहिरातीचे भरपूर पैसे चार्ज करता येणार नाहीत आणि त्यामुळे संसनाटी बातम्यांचे नोटिफिकेशन पाठवणे हा त्यांचा उद्योग आहे. जो ते करत राहणार  आहेत.  आपण मात्र आधीच विचार करून आवश्यक तितकाच बातम्यांच्या वाचनाचा उपभोग घ्यावा. आणि नकारात्मक बातम्या  बऱ्याच वाचनात आल्या तरी हे लक्षात घ्यावे की,  सत्य शोधण्याच्या पद्धतीचा वापर केला तर आपल्याबरोबर काही वाईट घडण्याची शक्यता ही एक टक्क्यांपेक्षाही खूप खूप कमी असते.

अशा पद्धतीने आपला दृष्टिकोन अधिक वास्तववादी केल्यास चिंता आणि नैराश्य कमी होण्यास नक्कीच थोडीफार तरी मदत होईल अशी खात्री वाटते.

Comments

Popular posts from this blog

मदतीचे सोपे नुस्खे

कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन म्हणजे वैचारिक गफलती

About me.