Anxiety Disorder.

चिंतेचे आजार 

भीती हा माणसाचा नैसर्गिक गुण आहे. जेव्हा आपण आदिमानव होतो तेव्हापासूनच आपण घाबरत असावं.
मोठा आवाज झाला की घाबरणे हे अगदी लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आपोआपच होते. वाघासारखा प्राणी पाहून देखील आपोआप भीती वाटते. या भीतीने आपल्याला जिवंत ठेवण्यात खूप मोठा मोठे योगदान दिले आहे. समोरून मोठा ट्रक येत असताना धाडस करून रस्ता ओलांडायचे ठरवले तर त्या माणसाला आपण बावळट म्हणू. तेव्हा वास्तववादी भीती असायला हवी.


पण आपल्या मेंदूला कधी घाबरायचे आणि कधी घाबरायचं नाही हे शिकवण एक कठीण टास्क आहे. प्रमाणाबाहेरची भीती चिंता घेऊन येते. सतत काळजी वाटणे, अस्वस्थ वाटणे, खूप जास्त विचार मनात येत राहणे, इत्यादी लक्षणे जनतेच्या चिंतेबाबत दिसून येतात.

चिंतेचे आजार साधारणतः 30 टक्के लोकांना कधी ना कधी होऊन जातात. पण चिंतेचे एका वर्षातील एखाद्या समाजातील प्रमाण दहा टक्के इतके असते. हे प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. याचा अर्थ चिंतेचे आजार समाजात सर्व दूर आढळतात. आपल्याला ते ओळखता येत नाहीत हा आपला दोष.

मी काल अभ्यास करत असताना मला असे लक्षात आले की, लहानपणी समुपदेशन उपलब्ध असते आणि त्याबद्दल मला माहिती असती तर मी नक्कीच समुपदेशकाकडे गेलो असतो. मला वाटणारी भीती अधिक ची आहे आणि ती नॉर्मल नाही हे कसे ओळखायचे हे मात्र कोणीतरी शिकवायला हवे होते. असो. मानवी प्रगतीचा इतिहास हा प्रश्न सोडवण्याचा इतिहास आहे. मला लहानपणी पडलेले प्रश्न मी नाही सोडवू शकलो पण आता पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन तर करू शकतो. म्हणून हा लेख प्रपंच.

चिंतेच्या आजारांपैकी सर्वाधिक आढळणारा आजार म्हणजे सर्वव्यापी चिंतेचा आजार. ही चिंता आपल्या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते. आपण रेल्वेतून जाताना अघटीत होईल काय ? ड्रायव्हर गाडी चालवताना झोपी जाईल काय ? मी लिस्ट मधून खाली येत असताना ती कोसळेल का ?
अशा पद्धतीच्या अनेक भीती माणसाच्या मनात येत राहतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रात भीती माणसाला त्रास देते, तेव्हा त्याला सर्वव्यापी चिंतेचा आजार असे म्हणायला हवे.

हा सर्वव्यापी चिंतेचा आजार काही लोकांमध्ये सहा महिन्यापेक्षा कमी काळ राहतो आणि पुन्हा निघून जातो. तर त्याला ऍडजस्टमेंटच्या चिंतेचा आजार असे म्हणता येईल.
आणि सहा महिन्यांपेक्षा अधिक राहिला तर जनरलाईजड चिंतेचा आजार असे म्हणता येईल.

याशिवाय काही लोकांना सामाजिक ठिकाणी इतरांशी बोलण्याची किंवा लोकांमध्ये मिसळण्याची चिंता वाटते. ही चिंता म्हणजे सोशल अंगजायटी दिस ऑर्डर हा प्रकार असतो.

यावर एका वाक्यातला उपाय म्हणजे भीतीवर रामबाण उपाय कृती. परंतु एका वाक्यात संपवण्याचा हा विषय नव्हे. लाखो लोकांना चिंतेच्या आजाराने अक्षरशः पछाडले आहे. वेठीस धरले आहे. या चिंतेवर कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी हा उपचार अत्यंत प्रभावी आहे. त्याबद्दल आपण काही सोप्या क्लुप्ती पुढच्या लेखात पाहू.

Comments

Popular posts from this blog

Jumping to Conclusions

About me.

मदतीचे सोपे नुस्खे