स्व नियंत्रण

सेल्फ रेगुलेशन म्हणजे स्व नियंत्रण

सध्या मी एका खाजगी शाळेमध्ये शालेय मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. शालेय मुलांना समाजामध्ये कसे वावरावे याचा परिपाठ घालून दिल्यास ती मुले मोठी होऊन भावनिकरित्या परिपक्व व्यक्ती म्हणून जीवन जगतात असा एक विचरप्रवाह आहे. 
Socio Emotional learning असा तो विषय. 
या विषयातला एक महत्त्वाचा मुद्दा मला प्रकर्षाने आवश्यक वाटतो तो म्हणजे स्व नियंत्रण.आपल्या बोलण्यावर किंवा वागण्यावर नियंत्रण म्हणजे स्व नियंत्रण. 

माणसाचे स्वतःच्या विचार, भावना आणि वर्तन यांवर नियंत्रण असायला हवे. यापैकी इतरांनी आपल्याशी अयोग्य वागल्यानंतर आपल्या मनात काय प्रकारच्या भावना याव्यात आपल्या  नियंत्रणात नसते. पण त्यावर काय विचार करावा   आपले वर्तन कसे असावे हे आपण ठरवू शकतो.

 आपले वर्तन आपल्या नियंत्रणात असते. आपले वर्तन म्हणजे आपण इतरांसमोर, समाजामध्ये वावरताना कसे वागतो, कसे वावरतो तसे बोलतो याची एकत्रित गोळाबेरीज. 
काही लोकांना फार बोलण्याची सवय असते. जैविक रित्या  काही व्यक्तींना अधिक बोलण्याची गरज पडते. त्या गरजेचा फायदा होऊन ते लोक अधिक बोलायला शिकतात. यातून बोलण्याचा सराव होतो पण चांगले बोलण्याचा सराव होत नाही. अशा व्यक्तींनी कमीत कमी शब्दात बोलायला शिकले पाहिजे आणि आवश्यक तेथे शांत राहायला शिकले पाहिजे. योग्य ठिकाणी शांत राहणे व कमीच कमी शब्दात तर्कसंगत मांडणी करण्यास शिकणे हे बोलण्यातले स्व नियंत्रण म्हणता येईल.
तसेच ज्यांना आलेला राग प्रत्येक वेळी व्यक्त करण्याची सवय असते.त्यांनी ती सवय मोडण्यासाठी स्वतःचे विचार तर्कसंगत करावयास हवे. आणि आपला राग प्रत्येक वेळी व्यक्त n करणे शिकावे. 

स्वतःला आणि स्वतच्या भावनांना मॅनेज करू शकणारे लोक अधिक यशस्वी होतात. तेव्हा हे स्व नियंत्रण शिकणे वेळेचा सदुपयोग ठरेल इतकं नक्की.

तूर्तास एवढेच लिहून थांबतो. वेळ काढून वाचलेत याबद्दल आभार. आपल्या कमेंट मौल्यवान आहेत त्या जरूर नोंदवा. 


 

Comments

Popular posts from this blog

मदतीचे सोपे नुस्खे

कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन म्हणजे वैचारिक गफलती

About me.