बातमी
बातम्यांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना दाखवल्यानंतर आपल्याला त्यामुळे फारच कसंतरी वाटू लागते. अशा वेळेला आपण नेमकं काय करावं असा एक प्रश्न मला माझ्या नातेवाईकाने विचारला ? त्याला उत्तर देताना मला असे जाणवले की ही समस्या अनेकांना असेल तर आपण याचा लेख बनवून ब्लॉगवर पोस्ट करावा. माणूस प्राण्याला गेंडा सारखे जाड कातडे नाही की वाघासारखे तीक्षण नखे नाहीत. हरणासारखे चपळ पाय नाहीत. पळून जायचे म्हटले तर वेग नाही. माकडासारखे पटपट झाडांवरून उड्या मारण्याची कौशल्य नाही. मग निसर्गाने मानवाला काय दिले तर एक मेंदू जो अगदी पटापट काम करू शकेल. भीती ही भावना माणसाला जिवंत ठेवण्याचे काम करते. म्हणजे असे पहा की माणूस घाबरलाच नाही तर तो कुठल्यातरी हिंसरा श्वापदाकडून शिकार होईल आणि संपूर्ण जाईल त्यामुळे माणसाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी खूप घाबरणारा मेंदू तयार करणे आवश्यक होते. हा मेंदू माणसाला सातत्याने आजूबाजूला काही धोका तर नाही ना याची माहिती घेण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे कोणतीही धोकादायक परिस्थिती पाहिल्याबरोबर माणसाला त्या घटन...