मदतीचे सोपे नुस्खे
थेरपी मधल्या काही गोष्टी अगदी सोप्या सोप्या वाटतात. सोप्या वाटलं तरी त्या संकल्पनांमध्ये सॉलिड दम असतो.
कार्ल रॉजर्स नावाचा एक नामांकित मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याची क्लायंट सेंटर्ड थेरपी ही पद्धत त्यानी विकसित केली. त्याच्या या पद्धतीला बऱ्याच मर्यादा देखील आहेत. साहजिकच आपण अभ्यासात असलेल्या सर्व संकल्पना मर्यादा असतात अशा याही संकल्पनेला आहेत.
हा रॉजर्स असं म्हणतो की, माणसाला जर पुरेसे पोषक वातावरण दिले तर माणूस स्वतःला विकसित करत नेतो. रॉजर्सचे म्हणणे असे की माणसे विश्वास ठेवण्यासारखी असतात आणि त्यांना स्वतःला समजून घेण्याचे काम जमू शकते. स्वतःला सकारात्मक दिशा देण्याची ताकद माणसांमध्ये असते.
Empathy म्हणजे समानुभव
Unconditional Positive Regard म्हणजे बिनशर्त सकारात्मक विचार/ आदर
Genuineness म्हणजे विशुद्ध खरेपणा
या गोष्टी समोरच्या व्यक्तीला स्वतःचा शोध घेत उपचारात्मक व्यक्तिमत्व बदल घडवून आणण्यास पुरेशा आणि गरजेच्या आहेत.
अनेकदा आपल्या अवतीभवती अनेक व्यक्ती अशा असतात ज्यांना मदतीची गरज असते. त्यांनी अनेकविध चुका केल्याने ते परिस्थितीच्या वेढ्यात अडकलेले असतात. अशा वेळेस त्या व्यक्तीने काय करावे व करू नये याचे अनेक ठोकताळे आपल्या मनात येऊ लागतात. नेमके अशा वेळेस आपण थोडे थांबायला हवे. समोरच्या व्यक्तीला अनेकदा त्यांची समस्या कोणीतरी ऐकून घेतली व धीर दिला तरी पुरेसे असते.
ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ही कविता मला या प्रसंगी आठवते. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणणारी व्यक्ती हीच अनेकांची गरज असते. समानुभव असलेली व्यक्ती आपल्याकडे समस्या घेऊन आलेल्या व्यक्तीला व्यक्त होऊ देते. स्वतःची मतं/ चुका प्रगट करू देते. समोरील व्यक्तीची अनेक मते हास्यास्पद असू शकतात पण तरी देखील त्या व्यक्तीबद्दल बिनशर्थ सकारात्मक आदर कायम ठेवते. आणि हे सर्व एकदा अगदी विशुद्ध खरेपनातून करते.
आपल्याकडे समस्या मांडणाऱ्या व्यक्तीला मदत करताना या तीन सोप्या बाबी सहज पाळता येऊ शकतात.
१.एक म्हणजे प्रेमळपणे त्याचे म्हणणे ऐकून घेणे. आपल्याला कोणीतरी स्वीकारतो आहे याची त्या व्यक्तीला जाणीव होऊ देणे.
२.स्वतःच्या समस्या सोडवण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये आहे यावर विश्वास ठेवणे आणि त्या व्यक्तीबद्दल त्याच्या चुकीच्या वर्तनासहित त्या व्यक्तीला प्रेमयुक्त/ आदरयुक्त स्वीकारणे.
३.आपल्या समोरील व्यक्तीच्या बद्दल मनात खरेपणा ठेवणे.
Comments
Post a Comment