About me.
पर्वा एका क्लाएंटचा कॉल आला होता. तो मला माझ्या मानसशास्त्र विषयातील एकंदरीत प्रवासाबद्दल विचारत होता. प्रत्येक वेळी प्रत्येकाला हे सांगणं शक्य होत नाही म्हणून शब्दरूपात मांडतोय.
२०१३ साली अभियांत्रिकीला असताना मी लोकसत्ता मध्ये एक लेख वाचला होता तो अल्बर्ट एलिस यांच्या बद्दलचा मी वाचलेला पहिला लेख. अल्बर्ट एलिस नावाची हि व्यक्ती आपल्याला आयुष्यात पुढे प्रचंड प्रभावित करणार आहे. याची काहीच कल्पना तेव्हा नव्हती. एलिस बद्दल त्या लेखाने पोट भरलं नाही म्हणून मग वेगवेगळ्या साईट्सवर एलिस बद्दल काही मिळतंय का हे शोधत असताना मी अल्बर्ट एलिस हे पुस्तक हाती पडलं. अंजली जोशी यांनी मराठीतलं एलिस यांच्यावर लिहिलेलं चरित्र मी भराभर वाचत गेलो. त्यातून मानसशस्त्र हा आधी मनात सुप्त आवड असलेला विषय आता मला शिकवा असं वाटू लागलं. पण अभियांत्रिकीतून पास झाल्यांनतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी, भावाच्या हॉटेलमध्ये व्यवस्थापनात लक्ष देणे, घरातील गाड्यांच्या व्यवसायात लक्ष घालणे असे बहुविध उद्योग केले. मग २०१७ साली मी स्वतःला तणाव जाणवतोय या कारणाने मानसशास्त्रज्ञ गाठले ज्यांचा खूप प्रभाव माझ्यावर पडला. पुढे त्यांचे आणि माझे स्नेहाचे नाते अधिक घट्ट झाले. ते म्हणजे आदरणीय सन्मित्र आशिष कोरडे. त्यांच्याकडे एका मानसोपचार पद्धतीचा कोर्स मी २०१७ व २०१८ मध्ये केला. पुढे मी एम ए ला ऍडमिशन घेतले व फायनान्स मध्ये नोकरी मिळवली. नोकरी करत असताना एम ए चे पहिले वर्ष पूर्ण केले आणि मग नोकरी सोडून पूर्ण वेळ अभ्यास करू लागलो. २०२१ मध्ये सर्व विषयांसह मी एम ए प्रथम दर्जा मिळवत उत्तीर्ण झालो. मानसोपचार क्षेत्रातील सी बी टी आणि आर ई बी टी या थेरपी मी आवडीने प्रॅक्टिस करत असतो . त्याचे काही युट्युब व्हिडियोज मी बनवून पोस्ट केलेले आहेत. मानसोपचारातील वेळ सोडल्यास पुरोगामी सामाजिक संघटनांमध्ये भाग घेणे हा माझा छंद आहे. त्याशिवाय पोहणे, चालणे, गाणी ऐकणे हे इतर छंद मी जोपासतो.
केवढं ते आत्म कौतुक. हुश्श्श...
Comments
Post a Comment