Jumping to Conclusions
जंक हा शॉटफॉर्म मी जंपिंग टू कन्क्लूजन या लॉजिक एररसाठी करून ठेवलेला आहे.जंक फूड जसे तब्येतीला चांगले नाही तसेच जंक विचार मानसिक तब्येतीला चांगले नाहीत. जंपिंग टू कन्क्लूजन म्हणजे निष्कर्षाप्रत उडी मारणे. आपण आपल्या जीवनात रोज अनेक व्यक्तींच्या वर्तनाचे, स्वतःच्या वर्तनाचे व परिस्थितीचे मूल्यमापन करीत असतो तेव्हा पुरेशी माहिती हाती उपलब्ध नसताना देखील आपण निष्कर्ष काढण्याची घाई केली अथवा निष्कर्षावर येण्याची उडी मारली तर त्यास जंपिंग टू कन्क्लूजन असे म्हणावे. वैज्ञानिक विचार पद्धतीने संशोधन करताना शास्त्रज्ञ उपलब्ध माहितीचा पुरेपूर वापर करतात. वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरून सत्य काय याचे निष्कर्ष शोधण्याचा प्रयत्न करतात. आपण जे शोधतो आहे त्याच्या विरोधी मत हेसुद्धा योग्य असू शकते असा वैज्ञानिक विचारपद्धती मध्ये मतप्रवाह असतो. रोजच्या जीवनात मात्र आपण पुरेश्या माहितीच्या अभावी निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो आणि चुकीचे निर्णय घेतो, अथवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो.यास जम्पिंग टू कनकलूजन म्हणजे जंक असे म्हणायला हवे असे जंक मानसिक आरोग्याला हानिकारक असते....